थ्रीजी प्रिंटर टेक्नॉलॉजीने बनवा स्वतःचा पुतळा

statue
फोटो, सेल्फी, पोट्रेट या प्रकारांना कंटाळला आहात काय? मग आता तुमच्यासाठी पॅरिसमधील नवीन पॉप अप दुकानात नवीन कांहीतरी आले आहे. ज्याचा उपयोग तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तींना भेट म्हणून देण्यासाठीही करू शकणार आहात. या दुकानात ग्राहकाला थ्रीडी प्रिंटर टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःचा मिनी व्हर्जन म्हणता येईल असा पुतळा तयार करून घेता येणार आहे.

अगदी आपल्यसारखाच दिसणारा हा पुतळा बनविण्यासाठी खर्चही फार करावा लागणार नाही. आपल्या आकाराच्या १२ वा हिस्सा इतक्या आकाराचा हा पुतळा २८५ डॉलर्स खर्च करून मिळू शकणार आहे. म्हणजे १७६०० रूपये त्यासाठी खर्च करावे लागतील. आपल्याला हव्या त्या कपड्यात आणि हव्या त्या पोझमध्ये हा पुतळा तयार करून घेता येणार आहे. जगात या प्रकारे पुतळे बनविणारे हे पहिलेच दुकान असून आत्तापर्यंत १५ जणांनी असे पुतळे बनवून घेतले आहेत. सेल्फीला कंटाळला असाल तर हा नवा पर्याय स्वीकारायला कांहीच हरकत नाही.

Leave a Comment