चॅँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा पराभव

hockey
भुवनेश्वर – चॅँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या ‘ग्रुप बी’मधील लढतीत भारताचा बलाढय़ जर्मनीकडून ०-१ पराभव झाला. लढतीत ४८ सेकंद बाकी असताना जर्मनीच्या फुचने केलेला गोल भारताच्या पराभवास कारणीभूत ठरला.

भारत मोठया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोक्याच्याक्षणी प्रतिस्पर्ध्याला गोलची संधी देतो, हे पुन्हा अधोरेखित झाले. यावर्षी हॉकी वर्ल्डकपमध्येही भारताने शेवटच्या मिनिटांमध्ये सामने गमावले होते. जर्मनीविरुद्ध पुन्हा तेच दिसले. मात्र अखेरची सेकंद सोडली तर सामन्यातील ५९ मिनिटे भारताने जर्मनीला चांगलेच झुंजवले. गोलकीपर श्रीजेशचा भक्कम बचाव तिसरे रॅँकिंग असलेल्या जर्मनीला यश मिळू देत नव्हता.

Leave a Comment