नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई-पणजी मार्गावर शिवनेरी

shivneri
मुंबई – मुंबईहून गोव्याला मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जाणा-या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे २० डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत मुंबई ते पणजी या मार्गावर शिवनेरी वातानुकूलित बससेवा चालवण्यात येणार आहे.

रात्री ८.०० वाजता ही बस मुंबई सेंट्रलहून सुटणार असून, ती दुस-या दिवशी पणजीला सकाळी ६.४० वाजता पोहोचेल. एसटीतर्फे चालवण्यात येणारी शिवनेरी ही बस लांब पल्ल्याच्या अंतरावर (५७४ किलोमीटर) पहिल्यांदाच चालवली जात आहे. मुंबई सेंट्रल ते पणजी या प्रवासासाठी १४६० रुपये तिकीट दर आहे.

ही सेवा दादर-कुर्ला, नेहरू नगर-मैत्रीपार्क-वाशी हायवे-नेरूळ-पनवेल-महाड-चिपळूण-लांजा-कणकवली-सावंतवाडी-हापसामार्गे चालवली जाणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ही सेवा ३१ डिसेंबर रोजी पणजीहून सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल. दुस-या दिवशी ती मुंबई सेंट्रल येथे सकाळी ३.४५ वाजता पोहोचेल.

सावंतवाडी-कणकवली-राधानगरी, कोल्हापूर-कराड-सातारा, स्वारगेट-पनवेलमार्गे या बसचा परतीचा मार्ग असेल. २० ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुंबईहून जाताना चिपळूणमार्गे तर परतीच्या प्रवासासाठी कोल्हापूरमार्गे बस धावेल. १ ते ५ जानेवारी या कालावधीत ही बस मुंबईहून कोल्हापूरमार्गे तर परतीच्या प्रवासासाठी चिपळूणमार्गे धावेल.

Leave a Comment