राष्ट्रवादीला हादरा; भाजपमध्ये जाणार गणेश नाईक!

ganesh-naik
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाईक कुटुंबाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच घरात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता भाजपाच्या वाटेवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.

गणेश नाईक यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी गणेश नाईक जातील त्या पक्षात जाण्याची तयारी दाखवत, गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

गणेश नाईक यांनी प्रवाहाबरोबर राहण्याची आजमितीस गरज असल्याची भावना व्यक्त करत पक्ष बदलाचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे गणेश नाईक भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीला मोठा हादरा बसेल, अशी चर्चा सुरु आहे.

Leave a Comment