क्रिकेट विश्वचषक २०१५च्या ड्रीम टीमची घोषणा

team-india
मुंबई – संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यीय निवड समितीची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या विश्वचषकासाठी भारताच्या ड्रीम टीमच्या निवडीसाठी आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संभाव्य ३० खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.

या ड्रीम टीमच्या ३० खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या केदार जाधव, धवल कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला असून मागील विश्वचषक विजयाचे शिलेदार विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंह, झहीर खान आणि हरभजन सिंह यांना डच्चू देण्यात आला आहे. अंतिम संघाची घोषणा निवड समिती ७ जानेवारी रोजी करणार आहे.

अशी आहे इंडिया ड्रीम टीम
महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केदार जाधव, मनोज तिवारी, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, संजू सॅमसन, आर अश्विन, परवेझ रसुल, कर्ण शर्मा, अमित मिश्रा, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, वरुण अॅरॉन, धवल कुलकर्ण, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा, अशोक डिंडा, कुलदीप यादव, मुरली यादव.

Leave a Comment