उच्च न्यायालयाने फेटाळल्या आवाजी मतदानाविरोधातील याचिका

highcourt
मुंबई – आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील भाजप सरकारने विधानसभेत आवाजी मतदानाद्वारे जिंकलेल्या विश्वासदर्शक ठरावाला आव्हान देणा-या सर्व याचिका फेटाळून लावल्या असून याप्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करु इच्छित नसल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेसने फडणवीस सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर या विरोधात रिट याचिका दाखल केली होती. तर संजय चिटणीस आणि राजकुमार यांनी या प्रकऱणी जनहित याचिका दाखल केली होती. त्यासोबतच केतन तिरोडकर यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका न्या.विद्यासागर कानडे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या.

Leave a Comment