मोरोक्कोत लादेन कंपनीचा भव्य मीनार

laden
रबात- अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनची बांधकाम कंपनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच मीनार मोरक्कोची आर्थिक राजधानी कासाब्लांका येथे उभारणार असून या योजनेसाठी १५ अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. सौदी अल्तुर्को होल्डिंग ग्रुपने ही योजना आखली आहे. अंकाच्या मुख्य बाजारात हा मीनार बांधला जाणार आहे.

कंपनीचे संचालक ओसामा अल हुसैनी या संदर्भात माहिती देताना म्हणाले मीनाराची उंची ५१४ मीटर असेल. हा मीनार उभा करताना अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कुराणात जितके अध्याय आहेत तितके म्हणजे ११४ मजले या मीनारात बांधण्यात येणार आहेत. अरब देशांतून उत्तर आफ्रिकेत होत असलेली गुंतवणूक गेल्या काळात घटली आहे. मात्र आमची कंपनी कासाब्लांकाजवळ बोस्कुरा शहरात २५० हेक्टरवर आधुनिक शहर उभारण्याची योजनाही राबविणार असून या बांधकामासाठी परवानगी मिळविण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment