मारुतीची नोव्हेंबरमध्ये ‘लाख’मोलाची वाहन विक्री

maruti
नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात विक्रीचा दबदबा वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असेल्या मारुती सझुकी इंडिया लिमिटेडचा राहीला. नोव्हेंबर महिन्यातील विक्रीचा अहवाल कंपनीने नुकताच सादर केला आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनीने देशभरात सर्व श्रेणीतील एकूण १ लाख १० हजार १४७ वाहनांची विक्री करून विक्रीची घौडदौड कायम ठेवली. मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात कंपनीने ९२ हजार १४० वाहनांची विक्री केली होती. नोव्हेंबर महिन्यात कॉम्पॅक्ट श्रेणीत येणार्याष रिटझ्, सेलेरिंयो व स्विफ्ट व स्विफ्ट डिझायर मिळून ३७३३९ कार्सची विक्री झाली. ती १३.८ टक्के वाढ दर्शविते. सुपर कॉम्पॅक्टमध्ये असणार्या३ डिझायर टूर्सच्या विक्रीत २२९.३ टक्कयांची भरघोस वाढ झाली असून १ हजार ८९ कार्सची विक्री झाली. मिड साईज श्रेणीतील एसएक्स् फोर व सियाजच्या विक्रीत देखील १३ टक्कयांची वाढ वाढ झाली असून, ३७३३९ कार्स विकल्या गेल्या, तीच विक्री २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये ६०३ इतकी होती. तसेच व्हँन्स श्रेणीत असणार्या ओम्नी व इको कार्सच्या विक्रीतही ५२.१ टक्कयाची वाढ नोंदवण्यात आली असून ती १२ हजार २०३ इतकी आहे.

Leave a Comment