पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात शॉन मार्शची वर्णी

shaun-marsh
अॅडलेड – ऑस्ट्रेलियन निवड समितीने गुरुवारी भारताविरुध्द होणा-या पहिल्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार मायकल क्लार्कच्या तंदुरुस्तीबद्दल प्रश्नचिन्ह कायम असल्याने शॉन मार्शची ऑस्ट्रेलियन संघात वर्णी लावली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारताविरुद्ध होणा-या कॉमनवेल्थ बँक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी अतिरिक्त फलंदाज म्हणून पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शचा संघात समावेश करण्यात येत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवड समितीने म्हटले आहे.

क्लार्कच्या तंदुरुस्तीबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह असून, तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की, नाही याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे त्याच्या जागी शॉन मार्शला संधी देण्यात आली आहे.

Leave a Comment