
अॅलडलेड – भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांतील पहिली कसोटी ब्रिस्बेनऐवजी अॅदडलेडला ९ डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे.
९ डिसेंबरला अॅडलेडला होणार पहिली कसोटी
गेली काही वर्षे क्रिकेटसाठी दिवगंत क्रिकेटपटू फिल ह्युज अॅ डलेडला स्थायिक असल्यामुळे त्याला आदरांजली म्हणून ब्रिस्बेनऐवजी अॅसडलेडला कसोटी खेळवावी, ही मागणी झाली होती. अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय यांनी सहमतीने अॅठडलेडला पहिली कसोटी खेळवण्याचा निर्णय घेतला.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अॅडलेड कसोटी दुसरी होती आणि १२ डिसेंबरपासून सुरू होणार होती. मात्र आता ती तीन दिवस आधी सुरू करण्यात येणार आहे. याउलट नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ब्रिस्बेनला होणारी पहिली कसोटी आता दुसरी ठेवण्यात आली आहे.
