दहशतवाद्यांचा गोळीबारात ३६ मजूर ठार

terrorism
नैरोबी – अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केनियामधील मंडेरा भागातील एका खाणीवर हल्ला केला असून अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात खाणीमधील ३६ मजूर ठार झाले.

सोमालियाच्या सीमेजवळ मंडेरा हा भागा असून हे अतिरेकी सोमालियाच्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेचे आहेत. मागील महिन्यातच अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी या भागातून नैरोबीला जाणा-या बसचे अपहरण केले होते. यावेळी प्रवाशांवर केलेल्या गोळीबारात २८ जण ठार झाले होते.

Leave a Comment