पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ

petrol
नवी दिल्ली – सर्वसामान्यांना इंधन दरात कपात करून दिलासा देणा-या केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली असून या वाढीव शुल्काचा भार ग्राहकांवर टाकला जाणार नसल्याचे सांगण्यात आले. कच्चा तेलांच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय तेल बाजारात घट होत असताना, सरकारने उत्पादन शुल्क करात वाढ केली आहे. नवी कर वाढ मंगळवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

यामुळे सरकारच्या महसूलात वाढ होणार असून, वित्तीय तूटही नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. तीन आठवडयात दुस-यांदा केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क करात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलांच्या किंमतीत घसरण होत असल्याने, तेल कंपन्यांनी सोमवारी प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर, प्रतिलिटर डिझेलच्या दरात ८४ पैशांनी कपात केली. ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात सातव्यांदा तर, डिझेलच्या दरात तिस-यांदा कपात झाली आहे.

Leave a Comment