कोहलीच्या हातून गेली नामी संधी

kohli
अॅडलेड – टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते आणि या मिळालेल्या संधीमुळे विराट कोहली फार उत्साहित होता पण त्याच्या या नामी संधीवर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्युज याच्या आकस्मिक निधनामुळे कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ४ डिसेंबरला होणारा पहिला कसोटी सामना आता ९ डिसेंबरला खेळविला जाणार असल्यामुळे टीम इंडियाचा नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपलब्ध होणार आहे आणि मिळालेल्या बातमीनुसार धोनी हा एकदम फिट झाला असून त्याचादेखील भारतीय संघात समावेश होणार आहे.

Leave a Comment