‘अग्नि-४’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

agni
बालासोर(ओदिशा) – मंगळवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ओदिशाच्या किना-यावर जमिनीवरुन जमिनीवर मारा करणा-या अणवस्त्रवाहू ‘अग्नि-४’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

या क्षेपणास्त्राची चार हजार कि.मी. पर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता असून हे क्षेपणास्त्र एक टन वजनापर्यंतचे अणवस्त्र वाहून नेऊ शकते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले असून याचे वजन १७ टन असून लांबी २० मीटर आहे.

Leave a Comment