मकाउ ग्रॉँप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू

sindhu
मकाउ- दुसरी सीडेड व गतविजेती पी. व्ही. सिंधूने शनिवारी उपांत्य फेरीत आठवी सीडेड थायलंडच्या बुसनॅनचा २१-१४, २१-१५ पराभव करीत मकाउ ग्रॉँप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेची एकेरीची अंतिम फेरी गाठली.

या विजयामुळे सिंधूला जेतेपद राखण्याची संधी चालून आली आहे. सिंधूने आगेकूच केली तरी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत तिसरा सीडेड भारताचा एच. एस. प्रणॉय सहावा सीडेड हॉँगकॉँगच्या विन्सेंट वोंगकडून १६-२१, २१-१६, १२-२१ पराभूत झाला.

Leave a Comment