जुन्या पुणे महामार्गावर गॅस टँकर पलटी

accident
पुणे- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चाकण फाट्यावर वळण घेताना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर उलटला. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली. या अपघातामुळे टँकरच्या व्हॉल्वमधून गॅसगळती झाली. टँकर रस्त्यावरच आडवा झाल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, द्रुतगती मार्गावरून वाहने वळविण्यात आली. टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने तीन-चार मोठी क्रेन मागविण्यात आली. त्यानंतर टँकर उभा करण्यात आला. टँकर उभा करताच व्हॉल्वमधून होणारी गॅसगळती सर्वप्रथम बंद करण्यात आली. मात्र, तोपर्यंत मोठी गॅस गळती झाली होती. पहाटे अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे चार-पाच बंब व एचपी कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. गॅसची गळती मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होती. तसेच आग तयार होऊ नये म्हणून सिगारेट ओढण्यास मनाई करण्यात आली होती.

Leave a Comment