भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग १५

manas
मानस नॅशनल पार्क
भूतानच्या जुन्या नॅशनल पार्कचा एक भाग असलेले मानस नॅशनल पार्क आसाम राज्यात आहे. हे अभयारण्य 1990 साली घोषित केले गेले असून येथे वाईल्ड वॉटर बफेलो, आसाम कासव, ससे, गोल्डन लंगूर, पिग्मी हॉग, हत्ती, वाघ, बाराशिंगा, गवे, आणियाई सोनेरी मांजरे, गेंडे असे अनेक प्राणी आढळतात.

रॉयल मानस नॅशनल पार्क हे हिमालयन रेंजमध्ये येणारे अभयारण्य असून नामशेष होऊ घातलेल्या अनेक प्राणी पक्षांचे ते माहेरघर मानले जाते. युनेस्काने जागतिक वारसा यादीत याची गणना केली असून ते प्रोजेक्ट टायगरचा तसेच हत्ती अभयारण्याचा एक भाग आहे. येथे 55 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात त्यातील 31 नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना येथे संरक्षण दिले गेले आहे. 450 प्रकारचे पक्षी येथे आहेत. त्यातील नामशेष होऊ घातलेल्या बेंगाल फ्लोरिकन ला येथे विशेष अभय दिले गेले आहे.

अभयारण्याची वेळ पहाटे साडेपाच ते सायंकाळी साडेसहा अशी आहे. नोव्हेंबर ते मार्च येथे भेट देण्यासाठी चांगला काळ. जवळचा विमानतळ गुवाहाटी असून रेल्वेने आल्यास बारपेटा रोड येथे उतरावे लागते.

Leave a Comment