आईने घेतला मुलाच्या हत्येचा बदला

mother
काबुल – एका महिलेने आपल्या मुलाच्या झालेल्या हत्येचा बदला म्हणून २५ तालिबानी अतिरेक्यांचा खात्मा केला असून तिच्या या हत्येमुळे ही आई सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.

रेझा गुल यांच्या सफीउल्ला नावाच्या मुलाची गेल्या १७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानच्या हिंसाचारग्रस्त पश्चियम फराह प्रांतात बालाबोलोक जिल्ह्यात तालिबानी अतिरेक्यांनी हत्या केली होती. पोलिस दलात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सफीउल्लाच्या हत्येने संतप्त रेझा यांनी बदला घेण्याचा निर्धार केला. सुमारे ५० ते ६० अतिरेक्यांनी आमच्या गावावर सकाळच्या वेळी हल्ला केला. माझा मुलगा गावाच्या सीमेवर तैनात होता. या हल्ल्यात त्यांनी माझ्या मुलाला मारले. रक्ताने माखलेला त्याचा मृतदेह पाहताच मी त्याच्या मारेकर्यांमना मारण्याचा निर्धार करीत बंदूक उचलली. हल्लेखोरांच्या समोर जाऊन मी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.गोळ्या संपेपर्यंत मी बंदूक चालवत राहिले, असा थरारक अनुभव या वीरमातेने माध्यमांना सांगितला.

Leave a Comment