पाच शहरात येणार दहा रुपयाच्या प्लॅस्टिक नोटा!

ten-rupess
नवी दिल्ली : १० रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानुसार दहा रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा देशातील पाच शहरामध्ये लवकरच चलनात येणार आहेत. प्लॅस्टिक नोटा बाजारात येणार असल्या, तरी सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा हटवण्यात येणार नाहीत.

या प्लास्टिकच्या नोटा आणण्यामागचा उद्देश खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढवणे आहे. कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या नोटा चलनात येणार आहेत.

प्रायोगित तत्वावर सध्या या नोटा चलनात आणल्या जातील. जर प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात दहा रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा अस्तित्वात येणार आहे.

Leave a Comment