मुंबईच्या बाजारात दाखल झाला फळांचा राजा

mango
वेंगुर्ले – गुरुवारी सायंकाळी उशिरा मुंबई वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ले भटवाडी येथील लता गुड्स ट्रान्स्पोर्टमधून दोन डझन हापूस आंब्याचे दोन बॉक्स व एक कैरी करंडा रवाना करण्यात आला.

तेंडोली येथील आंबा बागायतदार गुरुनाथ धोंडू सावंत यांच्या आंबा बागेतील दोन डझन हापूस आंबे, तर वेंगुर्ले राऊळवाडा येथील संदीप राऊळ यांच्या बागेतील एक कैरी करंडा मुंबई वाशी मार्केटमध्ये रवाना करण्यात आला.

Leave a Comment