
रियाध – एका पाकिस्तानी नागरिकाचा सौदी अरेबियामध्ये हेरॉइनची तस्करी केल्या प्रकरणी शिरच्छेद करण्यात आला. ऑक्टोबरच्या मध्यापासून अशा प्रकारची शिक्षा झालेला हा नववा पाकिस्तानी नागरिक आहे.
पाकिस्तानी नागरिकाचा तस्करी प्रकरणी शिरच्छेद
पाकिस्तानी नागरिक मोहम्मद रहमान मोहम्मद असघर हेरॉइनची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. या वर्षी हेरॉइनची तस्करी केलेल्या ७४ जणांना शिरच्छेदाची शिक्षा देण्यात आली आहे. यामध्ये परदेशी आणि सौदीमधील नागरिकांचा देखील समावेश आहे.
गेल्या वर्षी इराण आणि इराकनंतर सर्वाधिक फाशीची शिक्षा सौदी अरेबियात देण्यात आली होती असे, एमनेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे.
