महेंद्रसिंह धोनी होणार आहे पप्पा!

dhoni
नवी दिल्ली – टीम इंडियाचा कॅप्टन कुल कर्णधार महेंद्र सिंह धोनी लवकरच पप्पा होणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

याबाबतचे वृत्त टीम इंडियातील एका सुत्राने या वृत्तपत्राला दिली असून ही माहिती ज्याने दिली आहे, तो अनेक क्रिकेटरचा मार्केटींग एजंट असल्याचा उल्लेख या वृत्तात करण्यात आला आहे. या वृत्तानुसार धोनीची पत्नी साक्षी ही चार महिन्यांची गर्भवती असल्यामुळे पुढच्या वर्षात धोनीच्या घरात पाळणा हालणार असल्याचे दिसत आहे. काही माध्यमांनी याआधीही सांगितले आहे की, या वर्षाअखेरीस धोनी बाप बनणार आहे.

Leave a Comment