माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे – पेले

pele
साओ पॉलो – शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली.

पेले यांच्यावर १३ नोव्हेंबर रोजी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका वृत्तवाहिनीने पेले यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. त्यावर पेले यांनी आपली प्रकृती ठीक असल्याचे आज ट्विटरद्वारे स्पष्ट केले. तीन वेळा विश्वविजेते पेले यांच्यावर अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘माझी प्रकृती चांगली आहे. मी खूप खुश आहे की मला तुमचे प्रेम आणि सहकार्य मिळत आहे. धन्यवाद देवा चिंता करण्यासारखे काही नाही. आगामी सुट्ट्यांमध्ये मी माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणार आहे आणि चांगल्या आरोग्यासह नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. तसेच परदेशी टूर्सवरही जाणार असल्याचे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले.

Leave a Comment