साहित्य संमेलन हा रिकाम्या लोकांचा हा उद्योग – नेमाडे

nemade
पुणे – ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी पत्रकाराशी बोलताना साहित्य संमेलन भरवणे हा रिकाम्या लोकांचा हा उद्योग असून संमेलनावर चर्चा कऱणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे, हे परखड मत व्यक्त केले. यावेळी त्यांना महात्मा फुले समता पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

संत नामदेवांची कर्मभूमी घुमान येथे यंदाचे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले जाणार आहे. यावेळी त्यांनी संमेलनाच्या आयोजनावरही कडाडून टीका केली. हे संमेलन भरवण्यासाठी राजकारणी आणि उद्योजकांकडून पैसे घेतले जातात. शत्रूंकडूनही पैसे घेतले जातील. शहाणपणाला मर्यादा असते मात्र मूर्खपणाची काही हद्द नसते. संमेलन भरवणे ही नस्ती उठाठेव असून यातून केवळ चर्चा होते निष्पन्न काहीच होत नाही, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी मराठी भाषा, शिक्षण या मुद्दयांवर आपले मत मांडले. राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद कराव्यात आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षण द्यावे असे ते म्हणाले.

Leave a Comment