हेल्मेट मोहिमेंतर्गत ६० लाखाचा दंड वसूल

traffic-polis
पुणे – पुणे वाहतूक पोलिसांद्वारे १ नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या हेल्मेट मोहिमेंतर्गत आता पर्यंत ६० हजार २३६ दुचाकी वाहनचालकांकडून ६० लाख २३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी सांगितले की या दंडासोबतच लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने ऊभी करणे आणि नो पार्किंग अशा स्वरूपाच्या दंडाच्या माध्यमातून १ कोटी २ लाख ७२ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत.

Leave a Comment