आता राज ठाकरे कोकण दौऱ्यावर

raj
रत्नागिरी – कोकणसह राज्यभर मनसेचा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. या पार्श्ववभूमीवर पक्षांतर्गत चाचपणी आणि फेरबदलांचे निर्णय घेण्यासाठी डिसेंबरच्या दुसर्याड आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौर्यातवर येणार असल्याची माहिती विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी दिली. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर मनसेच्या पदाधिकार्यां शी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांनुसार काम न करणार्याद विद्यमान पदाधिकार्यां ना बदलून रिक्त जागांवर नव्या पदाधिकार्यां ची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे उपरकर यांनी यावेळी सांगितले. कोकणातील दौर्याात राज ठाकरे प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस राहून कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Leave a Comment