व्हॉटस अॅपवर श्रध्दांजली वाहून केली आत्महत्या

whatsapp
वाळवा – सांगली जिल्ह्यातील महादेव कुंभार या तरुणाने आपल्या व्हॉटस अॅपवरुन स्वत:चे छायाचित्र टाकून नावापुढे कैलासवासी असा मजकूर पोस्ट केला आणि नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

२२ वर्षीय महादेवचे आई-वडिल शेतमजूर असून, वेगवेगळया गावांमध्ये शेतमजुरीची कामे मिळवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. स्वत: महादेव एका कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. त्याचबरोबर त्याचे महाविद्यालयीन शिक्षणही सुरु होते. रविवारी रात्री महादेवने आपल्या व्हॉटस अॅपवर स्वत:चे छायाचित्र टाकले आणि त्याच्यापुढे कै. महादेव कुंभार यांना भावपूर्ण श्रध्दांजली असा मजकुर पोस्ट केला. सोमवारी आई-वडिल कामाला गेल्यानंतर घरात एकटया असलेल्या महादेवने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave a Comment