ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन

phill
सिडनी – साउथ ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूजला शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान ‘बाउन्सर’ चेंडू डोक्याला लागून गंभीर जखमी झाला होता मंगळवारपासून २५ वर्षीय ह्युजवर सिडनी येथील सेंट विन्सेंट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली. २५ व्या वर्षातच फिलीप ह्यूजचे निधन झाल्याची बातमी देताना अतिशय दु:ख होत आहे असे ट्विटरवर म्हटले आहे. फिलच्या मृत्यूच्या बातमीनंतर जगभरातील क्रिकेटपटू तसेच क्रिकेटप्रेमींकडून शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment