शरीराची क्षमता मनावर अवलंबून

management
नामवंत अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी गरिबीची व्याख्या करताना म्हटले आहे, ‘पॉव्हर्टी इज मिसमॅनेजमेंट ऑङ्ग ऍव्हेलेबल रिसोर्सेस.’ उपलब्ध साधन सामुग्रीचे गैर व्यवस्थापन म्हणजे गरिबी. भारताच्या गरिबीमागचे मूळ कारण हेच आहे. जगात भारताचा उल्लेख ‘गरीब लोकांचा श्रीमंत देश’ असा केला जात असतो. असे म्हणतात की, भारत हा श्रीमंत देश आहे पण त्यात गरीब लोक राहतात. याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. आपल्या देशाला साधन सामुग्री खूप मिळालेली आहे. निसर्गाने भरभरून दिले आहे. या देशात भरपूर पाणी आहे, सुपीक जमीन आहे, वर्षातून सरासरी २५० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश पडतो, खनिजे खूप आहेत. एवढे सगळे असूनही हा देश गरीब का आहे ? कारण आपल्याला उपलब्ध असलेल्या या साधनांचे नीट व्यवस्थापन करता येत नाही. या ठिकाणी व्यवस्थापन म्हणजे, कमीत कमी साधनांत जास्तीत जास्त उत्पादन करणे. भारतात पाणी, जमीन, हवा, ऊन, वारा आणि मनुष्यबळ या साधनांचे व्यवस्थापन नीट केले, त्यांचा नियोजनबद्धपणे आणि कौशल्याने वापर केला तर देश श्रीमंत होईल.

खरे तर भारत आणि अमेरिका यांच्यात निसर्गाने दिलेल्या देणगीच्या बाबतीत ङ्गारसा ङ्गरक नाही पण अमेरिका भारतापेक्षा किती तरी श्रीमंत आहे कारण अमेरिकेने निसर्गाच्या वरदानांचे आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन नीट केले आहे. त्यांचा कमाल वापर केला आहे. आता आपण हाच साधनांच्या व्यवस्थापनाचा नियम आपल्या स्वत:लाच लावू. निसर्गाने आपल्याला दिलेली साधने म्हणजे आपल्या क्षमता. आपण त्या नीट वापरत नाही. पण त्या नीट वापरल्या, त्यांचा कमाल वापर केला, त्यांच्या वापराचे व्यवस्थापन नीट केले तर आपली प्रगती होऊ शकते. आपण तसे व्यवस्थापन करीत नाही म्हणून मागे पडतो. निसर्गाने आपल्याला काय काय दिले आहे ? मन आणि शरीर दिलेले आहे. बोलण्याची कला दिली आहे. या सृष्टीत माणसासारखा विचार करणारा आणि बोलणारा अन्य कोणताच प्राणी नाही. तेव्हा आपली वाचा, आपले शरीर आणि मन यांचा नीट वापर केला, त्यांचे सुव्यवस्थापन केले तर आपण सुधारू शकतो. आपले योगशास्त्र असे सांगते की, आपण आपल्या मनाच्या आणि शरीराच्या क्षमतेचा एक टक्काही वापर करीत नसतो. त्यांची ९९ टक्के क्षमता वापरावाचून पडून राहते. अशा क्षमता पडून राहिल्या की त्या संपतात, नष्ट होतात. आपले ते सूप्त सामर्थ्य किंवा क्षमता पुन्हा कधीच जाग्या होत नाहीत. तेव्हा त्यांचा कमाल वापर करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. त्यांचा वापर आपण किती बेगुमानपणे करीत असतो याचे आपल्या जीवनातले सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपला अभ्यास.

मी माझ्या आयुष्यात असे काही विद्यार्थी पाहिले आहेत की, ते वर्षभर वह्या पुस्तकांना हात लावत नाहीत. जानेवारी महिना उलटायला लागला, गॅदरिंग संपले आणि परीक्षांची चाहूल लागली की मात्र त्यांची लगबग सुरू होते. त्यावेळी ते वह्या पुस्तकांना पहिल्यांदा हात लावतात आणि केवळ महिना दीड महिना अभ्यास करून चांगले पासही होतात.याचा अर्थ त्यांना कॉलेजचे एक वर्ष पार करायला दीड महिना पुरतो. पण याच विद्यार्थ्यांनी वर्षातले सात आठ महिने अक्षरश: टिवल्या बावल्या करीत वाया घालवलेले असतात. दीड महिन्याच्या अभ्यासात पास होणे ही अङ्गलातून ताकद त्यांच्यात असते. पण त्याची त्यांना जाणीव नसते. ते स्वत:च ती अनुभवत असतात पण हे आपले सामर्थ्य आहे हे त्यांना कळत नसते. हे कळून त्यांनी आपले हे सामर्थ्य सात आठ महिने पूर्णपणे वापरले तर त्यांना किती चांगले मार्क मिळतील याचाही त्यांनी विचार केलेला नसतो. तसा विचार करून त्यांनी नीट अभ्यास केला, अवांतर वाचन केले, भाषणे ऐकली, केली अशा आपल्या क्षमता नीट वापरल्या तर त्यांचे करीयर चांगले घडू शकते. ते घडवण्याची क्षमता त्यांच्यात असते.

तशी क्षमता नसती तर त्यांनी दीड महिन्याच्या अभ्यासात एवढे मार्क मिळवलेच नसते. अशा विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा नीट विचार करावा अशी कळकळीची विनंती करावीशी वाटते. या उदाहरणात व्यवस्थापनाचा आणखी एक घटक लपलेला असतो. तोही जाता जाता सांगतो. या मुलांनी खरेच आधीचे सात आठ महिने अभ्यास करायचा ठरवलेच तर त्यांना कमाल मार्क मिळतील हे खरे आहे पण तरी ते तसा अभ्यास करीत नाहीत. शेवटच्या दीड महिन्यातच अभ्यास करतात. कारण परीक्षा जवळ आल्याचे ‘टेन्शन’ त्यांना तसे करायला भाग पाडत असते. आता अभ्यास केल्याशिवाय काही पर्याय नाही अशी धास्ती त्यांना बसलेली असते. यावरून आपल्या लक्षात येईल की, टेन्शन माणसाला कमाल क्षमतेने काम करायला भाग पाडत असते. एरवी टेन्शन ही गोष्ट वाईट मानली जाते कारण, टेन्शनने हृदयविकार होत असतो. ऍसिडिटी वाढते आणि रक्तदाब वाढतो. झोप उडते आणि झोप कमी झाली की पुन्हा नवे नवे विकार बळावायला लागतात. एवढे सगळे अनर्थ टेन्शनने होतात म्हणून लोक टेन्शनला आपला नंबर एकचा शत्रू मानत असतात आणि टेन्शन मुक्त जगता येईल का याचा प्रयत्न करायला लागतात. खरे तर माणसाला टेन्शन पासून पूर्ण मुक्ती मिळू शकत नाही. त्याच्या जीवनात टेन्शन राहणारच आहे. या टेन्शनला घालवण्यापेक्षा त्याला नीट वापरले पाहिजे. त्याचे व्यवस्थापन नीट केले पाहिजे. ते करायला लागलो की टेन्शनही माणसाला कार्यरत करत असते हे लक्षात येते. ही हुशार मुले परीक्षेचे टेन्शन घेतात म्हणूनच शेवटचा दीड महिना नेटाने अभ्यास करतात. आधीचे सात आठ महिने अभ्यास करीत नाहीत कारण परीक्षेचा तणाव नसतो. परीक्षा लांब असते.

आता आपल्याला मनाच्या क्षमतेचे एक इंगित कळले असेल की, मनाची क्षमता अङ्गाट असते पण ती नेहमीच कमाल स्वरूपात व्यक्त होत नाही. एका विशिष्ट स्थितीत ती तशी व्यक्त होऊन आपल्यालाच चकित करते. एरवी ती सामान्य स्तरावर कार्यरत असते आणि ङ्गार सामान्य स्वरूपात व्यक्तही होत असते. आपल्या मनाच्या क्षमतेबाबत आपल्याला समजून घेण्याची ही गोष्ट आहे. मनाची क्षमता कोणत्या स्थितीत अधिक व्यक्त होते याचे आपले आपणच निरीक्षण करायचे आहे आणि ती क्षमता अधिकात अधिक काळ कमाल प्रमाणात व्यक्त कशी होत राहील याचा सराव करायचा आहे. यालाच म्हणतात व्यवस्थापन आणि आपल्याला लाभलेल्या क्षमतांचा कमाल वापर करण्याचे कौेशल्य.

Leave a Comment