भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

Michael-Clarke
अॅडलेड – ऑस्ट्रेलियाचा तेरा सदस्यीय संघ भारताविरुध्द होणा-या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जाहीर झाला असून, ऑस्ट्रेलियन निवड समितीने दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्कचा संघात अस्थायी समावेश केला असला तरी, त्याला दोन दिवसात आपला फिटनेस सिध्द करावा लागणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवड समितीचे प्रमुख रॉडनी मार्श यांनी २८-२९ नोव्हेंबरला भारताविरुध्द होणा-या दुस-या सराव सामन्यातही क्लार्कला खेळावे लागेल अशी माहिती दिली. चार डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ब्रिस्बेनमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघ – मायकल क्लार्क (कर्णधार), डेव्हीड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॅटसन, स्टीव्ह स्मिथ, ब्राड हॅडीन, मिचेल मार्श, रायन हॅरीस, जोश हाझलेवूड, मिचेल जॉन्सन, नाथन लयॉन, पीटर सिडल.

Leave a Comment