खुशखबर!!! तीन दिवसांत मिळणार ‘पीएफ’

epfo
नवी दिल्ली : येत्या डिसेंबरपासून ‘पीएफ’ची रक्कम काढण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ऑनलाईन सुविधा सुरू करणार असल्यामुळे ‘पीएफ’खातेधारकांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम तीन दिवसांत मिळणार आहे.

पाच कोटीहून अधिक ‘पीएफ’खातेधारकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. ज्या खातेधारकांचे बँक आणि ‘पीएफ’खाते आधार क्रमांकाशी संलग्न आहे. अशा खातेधारकांना या सुविधेचा लाभ होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सध्या ‘पीएफ’ची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरही अनेक महिने वाट पहावी लागत होती. आता या सुविधेने ‘पीएफ’खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment