अखेर इराणच्या न्यायालयाने केली घावामीची सुटका

Ghoncheh-Ghavami
तेहरान – मागच्या काही महिन्यांपासून पुरुषांचा व्हॉलीबॉल सामना पाहिल्यामुळे तुरुंगात असलेल्या घोनचेह घावामी या ब्रिटीश-इराणीयन महिलेची अखेर इराणच्या न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे.

२० जूनला तेहरानच्या आझादी स्टेडियमबाहेर पुरुषांचा व्हॉलीबॉल सामना पाहायला गेलेल्या घावामीला अटक करण्यात आली होती. इराणी कायद्यानुसार महिलांना पुरुष क्रीडापटूंचे सामने पाहण्याची परवानगी नसल्यामुळे आधी तिला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला व नंतर तिला अटक करण्यात आली. तेव्हापासून घोनचेह तुरुंगात होती.

या महिन्याच्या सुरुवातीला इराणच्या राजवटी विरोधात प्रचार केल्याचा ठपका ठेऊन तिला वर्षभर तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण न्यायालयाने तिची या शिक्षेतून सुटका केली.

Leave a Comment