भारताची ऑस्ट्रेलिया दौ-याला सराव लढतीने सुरुवात

team-india
अॅरडलेड – आजपासून (२४ नोव्हेंबर) दोन दिवसीय सराव लढतीने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला सुरुवात झाली असून क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) इलेव्हनविरुद्ध भारत येथे दोन दिवसीय सराव लढत खेळत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) इलेव्हनने आपल्या पहिल्या डावात सर्व गडी बाद २१९ धावा केल्या असून भारताकडून शमी, भुवनेश्वर आणि करण शर्माने प्रत्येकी २ गडी बाद केले तर वरुणने ३ गडी व अश्विनने १ गडी बाद केला. दिवसाखेरीस भारताने बिनबाद १६ धावा केल्या आहेत. धवन ५ आणि मुरली विजय ११ धावांवर खेळत आहे.

भारताच्या संघाने काल या सामन्यासाठी कसून सराव केला. ही सराव लढत भारतीय वेळेप्रमाणे पहाटे साडेपाच पासून सुरू झाली. पहिल्या सराव लढतीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्धच दुसरी सराव लढत २८ आणि २९ नोव्हेंबरला अॅरडलेड येथेच भारताला खेळायची आहे.

मात्र तेव्हा अॅेडलेड ओव्हलवर खेळायची संधी भारताला मिळेल. अॅरडलेड ओव्हल हे कसोटीचे केंद्र असून भारत तेथे दुसरी कसोटी खेळणार आहे. यंदा पहिली सराव लढत अॅ डलेडच्या ग्लिडेरोल स्टेडियमवर होणार आहे.

Leave a Comment