नव्या उच्चांकाच्या शिखरावर सेन्सेक्स, निफ्टी

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजारात संसदेच्या आज सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला अधिक गती मिळण्याची शक्यता असल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सोमवारी सकाळी बाजार उघडताच नवा उच्चांक प्रस्थापित केला. बीएसई सेन्सेक्सने १८० अंकांची उसळी घेत २८,५१४ या उच्चांकी स्तराला स्पर्श केला तर, निफ्टीने प्रथमच ८५००चा टप्पा पार केला.

बीएसई सेन्सेक्सने २१ नोव्हेंबरचा २८,३६० चा उच्चांक मोडत १८० अंकांच्या उसळीसह २८,५१४ चा नवा टप्पा गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने प्रथमच ८५०० चा टप्पा ओलांडत ८,५२९ वर पोहोचला.

Leave a Comment