बहुप्रतिक्षित आयपॅड ‘एअर २’ आणि ‘मिनी ३’ २९ नोव्हेंबरपासून भारतात

ipad
नवी दिल्ली – येत्या २९ नोव्हेंबरपासून भारतात विक्रीसाठी अॅपलचा बहुप्रतिक्षित ‘आयपॅड एअर २’ आणि ‘आयपॅड मिनी ३’ दाखल होणार असून या दोन्ही आयपॅडसाठी प्री-बुकिंग सुरु झाले असून २९ नोव्हेंबरपासून अधिकृत दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

‘आयपॅड एअर २’ हा फक्त ६.१ मिमी जाडीचा असून आधीच्या आयपॅडपेक्षा १८ टक्के कमी जाडीचा आहे. याचे वजनही केवळ ४३७ ग्रॅम इतके आहे. ३५ हजार ९०० ते ५९ हजार ९०० रुपये किंमतीदरम्यान सहा मॉडेलमध्ये हा आयपॅड उपलब्ध आहे. तसेच वायफाय कनेक्टिव्हीटी आणि वायफाय+ सेल्युलार कनेक्टिव्हीटी या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

फक्त वायफायची सुविधा असलेल्या १६ जीबी ‘आयपॅड एअर २’ ची किंमत ३५ हजार ९०० रुपये आहे, ६४ जीबीची किंमत ४२ हजार ९०० रुपये तर १२८ जीबीची किंमत ४९ हजार ९०० रुपये आहे. तर वायफाय+ सेल्युलार कनेक्टिव्हीटी असलेल्या तीन मॉडेलची किंमत ४५ हजार९००, ५२ हजार९०० आणि ५९ हजार ९०० रुपये इतकी आहे. तसेच ‘आयपॅड मिनी ३’ ची किंमत २८ हजार ९०० ते ५२ हजार ९०० इतकी आहे.

Leave a Comment