साक्षात ब्रह्मच अवतारले

baby
कोलकाता – पश्‍चिम बंगालच्या बरुईपूर येथे जन्मलेल्या बाळाच्या अवयवांचा पूर्णपणे विकास होण्याआधीच जन्माला आलेल्या एका बाळाला चक्क चार हात आणि चार पाय आहेत. या बाळाच्या आई-वडिलांनी आणि लोकांनीही त्याला चक्क ब्रह्मदेवाचा अवतार जाहीर करून टाकले आहे.

भगवान बालक (गॉड बॉय) असे या बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. हिंदू मान्यतेनुसार देवी-देवतांना अनेक हात, पाय असतात. आमचे बाळही तसेच आहे, असे त्याचे आई-वडील म्हणतात. या बाळाला पाहाण्यासाठी किंबहुना दर्शन घेण्यासाठी विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात लोक येथे येत आहेत.

गर्दी इतकी जास्त आहे की, या बाळाच्या घरासमोर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात लावण्यात आला आहे. गर्दीला नियंत्रित करताना पोलिस अक्षरश: तारेवरची कसरत करीत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे बाळ जन्मत: असामान्य आहे, अविकसित हात आणि पाय म्हणजे एकत्र जोडलेल्या जुळ्या बाळांचा परिणाम आहे. तथापि, घरातील लोक मात्र, या नव्या सदस्यामुळे फारच खुश आहेत आणि त्याला हिंदू देव ब्रह्माचा अवतार मानत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment