चीनच्या भूकंपात चार ठार

earthquake
बिजींग – ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का चीनच्या सिचुआन प्रांताला रविवारी बसला यामध्ये चार जण ठार झाले तर ७९ हजार ५०० जण बाधित झाले आहेत.

यामध्ये ५४ नागरिक जखमी झाले आहेत. तर सहा इतर जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान भूकंपामुळे फटका बसलेल्या प्रदेशांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुमारे ७९ हजार ५००हून अधिकांना याचा फटका बसला आहे. तर २५ हजाराहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

सहा हजार २०० नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यास आल्याचे अधिका-यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. बचावपथकासोबतच सहा लष्करी विमाने, २० वैदयकीय अधिकारी आणि एक हजाराहून अधिक सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.

Leave a Comment