विकास दर सहा टक्क्यांवर नेणार – अरुण जेटली

arun-jaitely
नवी दिल्ली – अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पुढील केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. आगामी काळ हा उत्तेजना देणाराच राहील, अशी ग्वाही दिली.

आपल्याला विदेशी गुंतवणुकीसाठी आणखी काही क्षेत्र खुले करावे लागणार आहेत. रुपयाचे मूल्य माफक स्तरावर स्थिर ठेवतानाच धोरण आणि कर व्यवस्थेलाही स्थैर्य प्रदान करण्याची गरज आहे, असे जेटली यांनी पीटीआयच्या मुख्यालयात या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना सांगितले.

आता मागे वळून पाहायचे नाही. उपरोक्त सर्व उपाय झाले की, २०१५-१६ या वर्षात आर्थिक विकासाचा दर सहा टक्क्यांवर गेलेला असेल. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची निरंतर वृद्धी होत राहील. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात काय राहणार आहे, असे विचारले असता, या अर्थसंकल्पात बर्‍याच महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत. कोळशावरील अध्यादेश, नैसर्गिक स्रोतांचे वाटप आणि विद्यमान जमीन संपादन कायद्यातही बदल करायचे आहेत. हे सर्व बदल तुम्हाला पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात दिसतील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment