भिकार्‍याची लक्षवेधी फॅशन

beggar
किव – युक्रेनमधील एक भिकारी सध्या तेथील नागरिकासाठी विशेष लक्षवेधी ठरला आहे. विस्कटलेले केस, फाटकेतुटके कपडे घालून रस्त्यातून भटकत असणार्‍या या भिकार्‍यात पाहण्यासारखे असणार काय? पण येथील नागरिकांना तो प्रश्न विचारू नका कारण या भिकार्‍याचे कपडे हेच लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

हा भिकारीही अन्य भिकार्‍यासारखाच आहे. तोही फाटकेतुटके कपडेच घालतो. पण हे कपडे घालण्यात त्याची कांही खास शान आहे. दिवसातून तो दोन वेळा कपडे बदलतो. त्याची ही स्टाईल लोकांचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरते आहे. हा भिकारी कोण असावा याचाही अनेकांना तपास घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यात यश आलेले नाही. एवढे मात्र खरे की या भिकार्‍याचे प्रशंसक वाढत चालले आहेत.एका फोटोग्राफरने तर त्याचा फोटो मासिकात छापूनही आणला आहे. एकंदरीत हा भिकारी फॅशन आयकॉन ठरला आहे.

Leave a Comment