कोटक महिद्रा बँकेकडून आयएनजी वैश्यचे अधिग्रहण

uday-kotak
खासगी क्षेत्रातील देशात चार नंबरवर असलेल्या कोटक हिंहिद्र बँकेने आयएनजी वैश्य बँकेचे अधिग्रहण केले आहे. सद्यस्थितीतील हा सर्वात मोठा बँकींग विलीनीकरणाचा सौदा ठरला आहे. या संदर्भातली घोषणा गुरूवारी करण्यात आली असून १५ हजार कोटी रूपयांचा हा अधिग्रहण सौदा शेअरच्या अदलाबदलीतून करण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रात नवनवीन बँका उदयास येत असताना हा सौदा महिंद्रसाठी लाभाचा ठरेल आणि बँकेला बळकटी देईल असा विश्वास बँकेचे संस्थापक व उपाध्यक्ष उदय कोटक यांनी व्यक्त केला आहे.

नव्या अधिग्रहणाने कोटक महिद्र १ लाख कोटींचे बाजार पूंजीकरण असणारी बँक बनणार आहे असे सांगताना उदय कोटक म्हणाले की वैश्य बँकेच्या सर्व शाखांसह १० हजार कर्मचारी आता कोटक महिंद्र बँकेचा हिस्सा बनणार आहेत. या विलीनीकरणामुळे कोटकला दक्षिण भारतात विस्तारसंधी उपलब्ध झाली आहे. नेदरलँड आयएनजी समुहात आयएनजी वैश्य बँकेची ४२.७३ टकके भागीदारी होती.ती आता कोटक महिंद्रकडे येणार आहे.

यापूर्वी बँकींग क्षेत्रात बँक विलीनीकरणाचा सौदा २०१० साली झाला होता. त्यावेळी आयसीआयसीआय बँकेत बँक ऑफ राजस्थान विलीन झाली होती.

1 thought on “कोटक महिद्रा बँकेकडून आयएनजी वैश्यचे अधिग्रहण”

  1. गजानन लशमणराव धर्माळे

    मला कोट महीद्रा बैंक अकाउंट खोलाटे आहे

Leave a Comment