आसूसचा पॅडफोन मिनी येणार

asus
आसूस इंडियाने येत्या पंधरा दिवसांत त्यांचा पॅडफोन मिनी भारतात लाँच केला जात असल्याची घोषणा केली आहे. या सात इंची टॅब्लेटला व्हॉईस कॉलिग सुविधा दिली गेली आहे. हा टॅब्लेट अँड्राईड ४.३ जेली बीनवर चालणार आहे. त्याची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

या टॅब्लेट बरोबरच आसूस जेन वॉचही बाजारात आणणार आहे. त्यासाठीही अँड्राईडचीच ओएस असेल. मात्र त्यासाठी जानेवारी २०१५ पर्यत प्रतीक्षा करावी लागेल. आसुसच्या प्रमुखांनी कंपनी सध्या स्मार्टवॉच ऐवजी स्मार्टफोन आणि टॅब्लेटवरच अधिक लक्ष देणार असल्याचेही जाहीर केले आहे.

Leave a Comment