छत्रपतींच्या स्मारकाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते

arbi
मुंबई – केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली तर अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजीमहारांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. अर्थात हे भूमीपूजन पुढील वर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपतींच्या जयंतीचा मुहूर्त साधून केले जाणार असल्याचेही समजते.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक बैठक घेतली. बैठकीत त्यांनी स्मारकासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळविण्यासाठीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीने यापूर्वी दोन निवडणुकांत छत्रपतींच्या स्मारकाचा मुद्दा आपल्या निवडणूक घोषणापत्रात मांडला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकींत प्रचारादरम्यान मोदींनी शिवराजांचे स्मारक उभारले जाईल असे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. त्यामुळे त्यांच्याच हस्ते स्मारकाचे भूमिपूजन व्हावे यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत.

Leave a Comment