‘स्पाइस’चा स्वस्तातला स्मार्टफोन

spice
नवी दिल्ली – भारतातील मोबाईल कंपनी ‘स्पाइस’ने बाजारात स्वस्तातला ‘स्टेलर ३६२’ हा स्मार्टफोन लाँच केला असून याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी म्हणजेच ५,४९९ रूपये इतकी आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन अँड्राईड ४.४ किटकॅट व्हर्जनवर आधारीत असून या फोनमध्ये ४८०-२३० रिझोल्यूशन क्षमता असलेला ३.५ इंचचा डिस्प्ले आहे. यामध्ये एलइडी फ्लॅशसह २ मेगापिक्सल रियर आणि १.३ प्रंट कॅमेरा आहे. १३०० एमएचची बॅटरी, १ गीगाहर्टज् डयुअलकोर प्रोसेसर आणि २५६ एमबी रॅम, २ जीबी इंटरनल स्टोअरेज क्षमता असून, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येणे शक्य आहे. याशिवाय जीपीआरएस, वायफाय, ब्लूटय़ूथ, मायक्रोयुएसबी या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment