‘एलबीटी’मुद्द्यावर भाजप सरकारचे घुमजाव

lbt
मुंबई : राज्य सरकारने केंद्राकडून जीएसटी करप्रणाली लागू झाल्याशिवाय एलबीटी रद्द करणार नसल्याचे संकेत दिले असल्यामुळे निवडणुकीच्यापूर्वी भाजपने व्यापा-यांना दिलेल्या आश्वासनावरून घुमजाव करीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. एलबीटी रद्द न झाल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.

उत्पन्नाचा एलबीटी व जकाती शिवाय दुसरा कोणताही पर्याय सरकारपुढे नसून केंद्र सरकारकडून अद्याप जीएसटीचा पर्याय उपलब्ध न झाल्यामुळे घाईघाईने एलबीटी रद्द करणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मात्र, व्यापा-यांचा एलबीटी रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव कायम आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी व्यापा-यांना एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, सत्तेवर आल्यानंतर सरकारला आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. एलबीटी रद्द न केल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे.

Leave a Comment