
पुणे – पुण्यातील एका उच्चभ्रु इंग्रजी माध्यमातील शाळेच्या उपमुख्याध्यापकाला विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या उपमुख्याध्यापकाचे नाव सुरेश जोन पॉल असे असून याच्याकडे नैतिकशास्त्र हा विषय शिकवण्याची जबाबदारी होती.
विद्यार्थिनींसोबत अश्लिल चाळे करणार उपमुख्याध्यापक जेरबंद
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शाळेतील आठवी – नववीत शिकणाऱ्या मुलींसोबत हा उपमुख्याध्यापक अश्लिल चाळे करत होता. मात्र या मुली भीतीपोटी ही गोष्ट कोणालाही सांगत नव्हत्या. मात्र या उपमुख्याध्यापकाचे हे चाळे अधिकच वाढल्यानंतर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर मग महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी शाळेतील मुलींना विश्वाधसात घेऊन त्यांीच्यालकडे चौकशी केली असता, अनेक मुलींसोबत तो अश्लिल चाळे करत असल्याीचे उघड झाले. उपमुख्याध्यापक सुरेश जोन पोलला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
