राज ठाकरे यांनी फेटाळली मनोमीलन होण्याची शक्यता

raj
पुणे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसर्या० स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो असताना तेथे उद्धव होता. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. या भेटीचा अर्थ शिवसेनेबरोबर मनोमीलन होईल असा नाही, असे सांगून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे-शिवसेनेच्या मनोमीलनाविषयी आपली भूमिका मंगळवारी स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भावना ऐकून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज ठाकरे पाच दिवसांच्या पुणे दौर्यािवर आले आहेत. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

Leave a Comment