पुन्हा सुरु किसान विकास पत्र योजना

kvr
नवी दिल्ली – ठराविक कालावधीत निश्चित आणि चांगला परतावा मिळवून देणा-या योजनांना गुंतवणूकदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशीच काहीशी लोकप्रियता केंद्र सरकारच्या ’किसान विकास पत्र’ योजनेला मिळाली होती. डिसेंबर २०११मध्ये बंद झालेल्या या योजनेचे मंगळवारी पुनरुज्जीवन करण्यात आले. ’किसान विकास पत्र’ ही केंद्र सरकारचे पाठबळ लाभलेली गुंतवणूक योजना आहे. योजनेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा होणारा निधी केंद्र सरकारच्या विविध विकासकामांमध्ये वापरला जाणार आहे. गुंतवणूकदारांना १०००, ५,०००, १०,००० आणि पन्नास हजार रुपये किंवा त्यापटीत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. कमाल गुंतवणूक किती असावी, यावर मर्यादा नाही.

Leave a Comment