कोकण दौ-यावर जाणार शिवसेना पक्षप्रमुख

uddhav
मुंबई – उद्धव ठाकरे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोकणातील मतदारांचे विशेष आभार मानण्यासाठी २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी कोकण दौ-यावर जाणार आहेत.

उद्धव ठाकरे २२ नोव्हेंबर रोजी सकाळी गणपतीपुळे येथे येणार असून गणपतीपुळे येथील गणेशदर्शन घेऊन मालगुंड ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिल्यानंतर दिवसभरात आरे-वारे बिच, दाभोळे देवगड, श्री क्षेत्र कुणकेश्वर तसेच मालवण देवबाग, तारकर्ली येथे जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला सकाळी तारकर्ली येथील स्कुबा ड्रायव्हिंग पाहणी तसेच प्रशिक्षण केंद्राला भेट त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला तसेच चिपी विमानतळ, आरवली वेतोबा मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी आरोंदा येथे येणार आहेत. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, उदय सामंत, राजन साळवी, दीपक केसरकर, वैभव नाईक आदी सोबत असणार आहेत.

Leave a Comment