
सुवा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी द्वीपसमूहांच्या देशांशी असलेले संबध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने फिजी देशाला ७.५ कोटी अमेरिकन डॉलर कर्ज सुविधा देण्याची घोषणा केली असून फिजीमधील गावांच्या विकासासाठी ५० लाख डॉलर निधीही देण्याची घोषणा करण्यात आली.
फिजी देशाला भारत देणार कर्ज
दहा दिवसांच्या परदेश दौ-यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याचा हा अखेरचा टप्पा आहे. ३३ वर्षांनी पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान फिजीच्या दौ-यावर आले आहेत. या आधी १९८१ मध्ये इंदिरा गांधीनी पंतप्रधान असताना फिजीला भेट दिली होती. यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी फिजीकडून जय्यत तयारी कऱण्यात आली होती. फिजीमधील सुवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर फिजी पंतप्रधान फ्रँक यांनी मोदींचे स्वागत केले. तसेच त्यांना गार्ड ऑफ ऑनर ही देण्यात आला. त्यानंतर मोदींनी फिजीच्या संसदेसमोर भाषण केले.
