लेखी परिक्षते २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक

exam
पुणे – राज्य शासनाने ९ ते १२ वीच्या परिक्षेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून यापुढे ९ ते १२वीच्या विद्यार्थांना लेखी परिक्षेत २० टक्केगुण मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१०वी आणि १२वीच्या विद्यार्थांना यापूर्वी हा नियम लागू होता. आता मात्र, राज्य शिक्षण मंडळाने ९वी ते १२वीच्या विद्यार्थांना लेखी परिक्षेत २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणांची अट कायम ठेवण्यात आली आहे. २०१६ मार्चपासून या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यापूर्वी लेखी परिक्षेत कितीही कमी गुण मिळाले तरी तोंडी परिक्षेत शाळेतर्फे गुणांची वाढ करून विद्यार्थांना उत्तीर्ण करण्यात येत होते. अशी पद्धत आता बंद होणार असून, विद्यार्थांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमाने शिक्षणाचा स्तर उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होते का, हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Comment